परमेश्वर नावाच्या शक्तीचा कसलाही पुरावा गेल्या पाच हजार वर्षांत माणसाला देता आलेला नाही
असं सांगतात की, अयोध्येला राममंदिर बांधलं की, भारतीय समाजाचे सगळे प्रश्न सुटणार आहेत. असं सांगणं ही उघडउघड धूळफेक असते आणि हेही राजकारणी जाणूनबुजून करतात. त्यात सामान्य माणूस बळी पडतो. कारण त्याची बुद्धी कुठेतरी ‘गहाण’ पडलेली असते. स्वतःची बुद्धी तो स्वतंत्र विचार करायला वापरू लागला, तर ती गोष्ट होणार नाही. माणूस आपली विचारशक्ती दुसऱ्या कुणाकडे गहाण टाकतो, तेव्हा तो सबंध माणूसजातीचा ‘अपमान’ करतो.......